chhatrapati sambhaji nagar,  saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News : बकरीला वाचवताना तलावात बुडून मुलांचा मृत्यू, डवाळात शाेककळा

या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात घडली आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही वैजापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे डवाळा परिसरात शोककळा पसरली आहे. (Maharashtra News)

शाहीद इरफान सय्यद (वय 18) व आयुष संतोष पडवळ (वय 13) असे या घटनेतील मयत तरुणांचे नाव आहे. आयुष हा समृध्दी महामार्गालगत असलेल्या एका तलावालगत बकऱ्या चरवत असताना त्याची एक बकरी पाण्यात पडली. तिला काढण्यासाठी तो गेला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू (drowned) लागला.

ही बाब शाहीदने बघितल्यावर रोजी त्याला वाचवण्यासाठी गेला मात्र अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडायला लागला परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी शाहीदला बाहेर काढले. तातडीने त्याला वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

आयुष हा पाण्यात खोलवर बुडल्याने त्याला नागरिकांना काढता आले नाही. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आयुषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहे. एकाच दिवशी गावातील दोन तरुणांना सोबत काळाने घाव घातल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT