Shahapur News  Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News: पिकनिक जीवावर बेतली! धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू, शहापूरमधील घटना

Shahapur News: शहापुरातील खोर गावातील धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

फैय्याज शेख

Shahapur News:

शहापुरातील खोर गावातील धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील पिवळी खोर गावाच्या हद्दीतील जंगलात ही घटना घटना घडली. या घटनेनंतर वाशिंद पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शहापुरातील खोर गावाच्या धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी वाशिंद पोलिस व जीवरक्षक टीमचे सदस्य दाखल आहे. या मृतांची ओळख पटली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृतांची ओळख पटली

खोर गावाच्या धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक जण मुरबाड तालुक्यातील असून दुसरा आंध्र प्रदेश येथील असल्याचे समजते आहे. शहापूर तालुक्यातील पिवळी खोर गावाच्या हद्दीतील जंगलात काही तरूण धबधब्यावर गेले होते.

मौज-मजा करत असताना दोघांचा तोल गेल्याने धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संध्याकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह हे बाहेर काढण्यात आले आहेत.

धनंजय गायकवाड हा मुरबाड तालुक्यात राहाणारा आहे तर कार्तिक रेड्डी हा आंध्रप्रदेश येथील आहे. घटनास्थळी वाशिंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी व जीवरक्षक टीमचे सदस्य पोहोचले आहेत. या दोघांचे मृतदेह शहापूर येथील रूग्णालयात आणले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT