two tigers will include in navegaon nagzira tiger reserve soon from tadoba Saam Tv
महाराष्ट्र

Navegaon Nagzira Tiger Reserve : ताडोबातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार तीन वाघ

यासाठीची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती विभागाने दिली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News :

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा तीन वाघ आणणार असल्याने या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता १९ पर्यंत पोहोचणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन वाघ या प्रकल्पात पुढील महिन्यात सोडण्यात येणार आहेत. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे २०२३ रोजी गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आले. या व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या आहेत.

आता दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्यात या व्याघ्र प्रकल्पात सर्वप्रथम तीन वाघ सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची एक चमू नुकतीच ताडोबा येथे जाऊन आली आहे अशी माहिती विभागाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT