Gondia School Student Death Saam TV
महाराष्ट्र

Gondia News : टॉयलेटचे कारण सांगून शाळेतून बाहेर पडले, परत आलेच नाही; तिसरी शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Gondia School Student Death : तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद दासगाव (खुर्द) शाळेच्या परिसरात घडली.

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही

तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद दासगाव (खुर्द) शाळेच्या परिसरात घडली. मंगळवारी (१३ ऑगस्ट) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आलोक भागचंद बिसेन (वय ९) आणि प्रिन्स किशोर रहांगडाले (वय ९) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी दोघेही विद्यार्थी नियमितपणे शाळेत आले. दुपारचे जेवण झाल्यानंतर त्यांनी टॉयलेटचे कारण सांगत वर्गशिक्षकाकडून सुट्टी घेतली. बराच वेळ होऊनही ते परत शाळेत आलेच नाही. दोघांचेही दप्तर वर्गातच असल्याने वर्गशिक्षकाने या घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली.

पालकांनी त्यांची शोधाशोध घेतली असता, यावेळी दोघांचेही मृतदेह शाळेजवळील मुरुमाच्या खड्ड्यात आढळून आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील अभोरे यांनी घटनास्थळ गाठत दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. शाळेतील शिक्षकाने लक्ष न ठेवल्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचा जीव गेला, असा आरोप गावकऱ्यांनी केली.

प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे दिसून येताच गोंदिया शहर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत पोलीस बंदोबस्त वाढवला. घटनेची माहिती मिळतात शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये व शिक्षणाधिकारी महामुनी आपल्या सहकारी शिक्षकांसह रुग्णालयात धाव घेतली.दोन्ही बालकांच्या पालक आणि कुटुंबियांना सांत्वन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT