Accident News, Tuljapur, Latur, Police Saam tv
महाराष्ट्र

Accident News : तुळजाभवानीच्या दर्शनास चाललेल्या भाविकांच्या वाहनांना भीषण अपघात; पाेलीस धावले मदतीला

या अपघातामधील जखमींवर रुगणालयात उपचार सुरू आहेत.

दीपक क्षीरसागर

Navratra : लातुर (latur) जहिराबाद महार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात (accident) दोन जण ठार झाले आहेत. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

लातुर जहिराबाद महार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर रविवारी सांयकाळी सहाच्या दरम्यान दाेन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातावेळेस दोन्ही दुचाकी चालक आणि अन्य दाेघे दुरवर फेकले गेले. (Tajya Batmya)

या अपघातात दाेघे जखमी झाले. तर दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातामधील जखमींना औराद पोलिसांनी हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात सूर्यकांत हाणमंत खांडेकर (वय ६५) व अशोक गुणवंतराव कोळेकर पाटील (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघे लातुरहुन आपल्या गावाकडे केसरजवळगा येथे जात होते. तर सोमपुर (ता. भालकी) येथील सतीश तानाजी विरादार (वय २९) व मुकेश छत्रुगन बिरादार हे दोघे मोटार सायकलने तुळजापूर देवी दर्शनासाठी जात होते. हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT