Mumbai-Nashik Highway Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कार संरक्षण भिंतीला धडकली नंतर..; दोघांचा मृत्यू

Shahapur Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कारला भीषण अपघात झाला. अनियंत्रित होत कार संरक्षण भिंतीला धडकली त्यानंतर कार डिव्हायडरवर आदळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Priya More

Summary -

  • मुंबई–नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात

  • कार संरक्षण भिंतीला धडकल्यानंतर डिव्हायडरवर आदळून चक्काचूर झाली

  • दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला

फैय्याज शेख, शहापूर

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने आधी संरक्षण भिंतीला धडक दिली. नंतर ही कार ४० ते ५० फूटांवर जाऊन डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू धाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबई-नाशिक आग्रा महामार्गावर शहापूरजवळ अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार संरक्षण भिंतीला धडकली. त्यानंतर ही कार डिव्हायडरवर आदळली. या अपघातामध्ये मयुरेश विनोद चौधरी (वय- २९ वर्षे) रा. तानसा) आणि जयेश किसन शेंडे (वय २५ वर्षे, रा. उंबरखाड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल पांडूरंग जाधव (वय २९ वर्षे) रा. पेंढरघोळ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.

दरम्यान, नवी मुंबईत कार अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात जेएनपीटी- पनवेल मार्गावर झाला. सहा तरुण कारने रात्री जेवणासाठी हॉटेलवर जात होते त्यावेळी ही घटना घडली होती. भरधाव कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर चौघे जण जखमी झाले होते. जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: पश्चिम-आशियाच्या युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; गॅसच्या दरवाढीदरम्यान सरकारचा LPG सिलिंडरबाबत मोठा निर्णय

Maharashtra Live News Update :नालासोपारात पिसाटलेल्या रेड्याचा धुमाकूळ; दुचाकीला धडक देत दुकानात घुसला

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांचा वाद पुन्हा चिघळला; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? स्वामीनारायण मंदिरात आढळले दोन तरुणींचे मृतदेह

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT