Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident : चरणमाळ घाटातील बस अपघातात चालकासह चिमुकलीचा मृत्यू, बारा प्रवासी जखमी

चरणमाळ घाट अती तीव्र उतार व वळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होतात.

दिनू गावित

Nandurbar : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात अति तीव्र उतार वळणामध्ये रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान सटाणाहून गुजरात नडियाद येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात चालक व एका अठरा महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला असून दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा अपघात रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान झाला. त्यानंतर 108 व खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना नवापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात झालेल्या खाजगी लक्झरी बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे.

चरणमाळ घाट अती तीव्र उतार व वळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होतात. काल रात्री झालेला अपघात खाजगी लक्झरी प्रवासी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तर प्रवासी भयभीत झाले हाेते. त्यांना स्थानिकांनी धीर दिल्याचे नागरिकांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT