Crime News, Nagpur Saam tv
महाराष्ट्र

दारूच्या नशेत जावयाने सासू-सासर्‍यांचा केला खून; पत्नीसह, मुलगी गंभीर जखमी, आयसीयूत दाखल

या घटनेचा तपास पाेलीस कसून करीत आहेत.

मंगेश मोहिते

नागपूर : दारूच्या नशेत मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना (nagpur) एमआयडीसी (midc) पोलीस स्टेशन (police station) अंतर्गत येणा-या अमर नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (nagpur latest crime news)

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अमर नगर परिसरात दुहेरी हत्याकांड झाले असून पाेलीस घटनास्थळी पाेहचले आहेत. प्राथमिक माहितीनूसार नरमु यादव या व्यक्तीने दारूच्या नशेत मध्यरात्री त्याच्या वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत भगवान रेवारे आणि पुष्पा रेवारे गंभीर जखमी झाले हाेते. त्यांचा मृत्य झाला आहे.

या घटनेत यादव याची पत्नी कल्पना व मुलगी मुस्कान या दोघींवर देखील कुऱ्हाडीने वार झाल्याचे समजते. त्या दोघांची स्थिती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता यादव कुटुंब यांच्यात गेले तीन-चार दिवसांपासून वाद सुरू होते. नरमु यादवने दारूचे नशेत पुन्हा वाद उकरून काढले आणि त्यात दाेघांची हत्या केली. या घटनेचा तपास पोलीस कसून करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Shivsena Dasra Melava: मनसे आणि शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले | VIDEO

प्रवास करताना परदेशात तुमचा पासपोर्ट हरवला? तर परत कसा मिळवाल?

Milk: झोपण्यापूर्वी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?

Maharashtra Dasara Melava Live Update: हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

SCROLL FOR NEXT