kolhapur kalammawadi Saam tv
महाराष्ट्र

Shocking News : पावसाळी पर्यटन बेतलं जीवावर; ताम्हिणीनंतर कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

kolhapur kalammawadi Latest News : कोल्हापुरातील निपाणी येथे राहणाऱ्या दोघांना पावसाळी पर्यटन करणे जीवावर बेतलं आहे. कोल्हापुरातील दूधगंगा नदीत या बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : पुण्यानंतर आता कोल्हापुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील दोघांना पावसाळी पर्यटन करणं महागात पडलं आहे. कोल्हापुरातील दोघांचा काळमवाडी येथील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही तरुण निपाणी येथील रहिवासी होते. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील दूधगंगा नदीमध्ये दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील निपाणी येथे राहणारे तरुण काळमवाडी येथी दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. पावसाळी पर्यटनासाठी १३ जण निपाणी होऊन काळमवाडी परिसरात आले होते. या १३ जणांपैकी २ तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

ताम्हिणी घाटात तरुण गेला वाहून

पुण्यातील ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या तरुणाचा वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा तरुण त्याच्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील स्वप्नील धावडेने ताम्हिणी घाटातील पाण्यात उडी मारली. त्यानंतर हा तरुण जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.

भूशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण बुडाले

लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील चौघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पाचपैकी एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT