Nagpur crime news SAAM TV
महाराष्ट्र

Nagpur Crime : दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं, धक्कादायक कारण उघड

Nagpur sitabardi Killing Case : नागपूर दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं हादरलं. जुन्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये भयंकर घटना घडली. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांडानं शहर हादरून गेलं. वसंतराव नाईक झोपडपट्टीत ही घटना घडली. जुन्या वादातून दोघांवर हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बीडमधील हत्या प्रकरण, पुण्यातील बलात्काराची घटना, तसेच नाशिक, पुण्यासारख्या ठिकाणी कोयता गँगचा सुरू असलेला धुमाकूळ यामुळं राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही दुहेरी हत्याकांडासारखी भयंकर घटना घडली आहे.

नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा तरुणांची हत्या करण्यात आली. येथील वसंतराव नाईक झोपडपट्टीत बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. झोपडपट्टीतील दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या अन्य एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतराव नाईक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील दोघा तरुणांवर बुधवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात सागर मसराम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण गोडे याचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

जुन्या वादातून तरुणांना संपवलं

हे दुहेरी हत्याकांड जुन्या वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्या प्रकरणात चंदू नावाच्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. मृत तरूण आणि मारेकरी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT