दोन मुलींनी तरुणाचा घरात जाऊन केला विनयभंग अन् दिली जीवे मारण्याची धमकी Saam TV
महाराष्ट्र

दोन मुलींनी तरुणाचा घरात जाऊन केला विनयभंग अन् दिली जीवे मारण्याची धमकी

अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.

विनोद जिरे

बीड : ऐकावं ते नवलच तरुणीचा विनयभंग झाल्याचं अनेक वेळा ऐकलं असेल.. मात्र बीडच्या अंबाजोगाई शहरात (Beed Ambajogai News) दोन मुली 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या, वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. इतकंच नाही, तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाई शहरात दोन तरुणींनी एका मुलाच्या मदतीने 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केल्याची घटना घडली. अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. एका मुलाला घेऊन दोन तरुणी 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. त्यानंतर तरुणींनी त्या तरुणाला शिवीगाळ करत जीवे मरण्याची धमकीही दिली. ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत घडली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने अंबाजोगाई शहरात चर्चेला उधाण आले आहे. तसेच गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली नसल्याने या मुलींना अटक करून न्याय द्यावा. अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:२ ते ५ महिन्यात देशात मोठी गडबड होईल - राज ठाकरे

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

SCROLL FOR NEXT