Parbhani Selu Accident News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

बालाजी भारत गायकवाड (वय 23) भाऊसाहेब महादेव सागडे (वय 22) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

राजेश काटकर

परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सेलू तालुक्यात अपघाताची एक भीषण घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरधार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Parhani News Today)

अपघातानंतर (Accident) टेम्पो चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. बालाजी भारत गायकवाड (वय 23) भाऊसाहेब महादेव सागडे (वय 22) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

दोघेही तरुण सेलू तालुक्यातील लाडनांद्रा गावातील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, दोघेही तरुण दुचाकीवरून जात असताना, पाथरी रोडवरील पान्हेरा पाटीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी धाव घेत टेम्पोचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. टेम्पोच्या धडकेत एकाच गावातील दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने सेलू तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापुरात डंपरच्या धडकेत शिक्षिका ठार

सोलापूर शहरातही अपघाताची भयंकर घटना घडली. शाळेतून घराकडे परत निघालेल्या शिक्षिकेला पाठीमागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. अपघातात डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. निलोफर आसिफ मुजावर असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT