Sangli Crime News, miraj saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : सावकारी पाश... 20 टक्के दराने 10 लाख 51 हजार घेतले तरी..., मिरजेतील खाजगी सावकार बंधूंवर गुन्हा दाखल

पाेलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 1 लाख 60 हजार रूपयांच्या व्याजा पोटी खाजगी सावकाराने 10 लाख रुपये व्याज घेतले. तरी देखील आणखी सहा लाख रुपयांची मागणी करून मारहाण केल्या प्रकरणी खाजगी सावकार बंधुंवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

या प्रकरणाबाबत पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी - मिरज (miraj) येथे इम्रान लांडगे यांनी खाजगी सावकार बंधूंकडून एक लाख साठ हजार रुपये कर्ज घेतले. त्या बदल्यात 10 लाख 51 हजार रुपये असे 20 टक्के दराने व्याज देऊन ही त्यांनी 6 लाख रुपयांची मागणी केली. पैसे देत नसल्याने खाजगी सावकारांनी इम्रान या मारहाण केल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मलिक मेहबूब शेख (वय 33) आणि चांद मेहबूब शेख (वय 41, राहणार दोघे निपाणीकर कॉलनी, मिरज) यांच्यावर खाजगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT