Latur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident News : लातूर-औसा महामार्गावर दुचाकी अन् कारचा विचित्र अपघात; तीन गंभीर जखमी

या विचित्र अपघातात तीन गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे.

दीपक क्षीरसागर

Latur Accident News : दुचाकीला वाचविण्याच्या नादात दोन दुचाकी, दोन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात तीन गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. यातील एक दुचाकी आणि एक कार पुलावरून नदीपात्रात कोसळली आहे. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Latest Marathi News)

लातूर (Latur) ते औसा महामार्गाचे सध्याला काम सुरू आहे. दरम्यान, पेठ गावानजीक असलेल्या नदीवरील पूल अरुंद असून, त्याचेही काम सुरू आहे. या पुलावर भरधाव असलेल्या दोन कार आणि दोन दुचाकींचा अपघात (Accident) झाला. एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात हा अपघात याल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. हा अपघात एवढा विचित्र होता की, रात्रीच्या काळोखात काहीच समजत नव्हते. अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली.

घटनास्थळी आलेल्या गावकऱ्यांनी, तेथील वाहनधारकाने घटनेची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले. त्यांनी तातडीने अपघातातील तिघा गंभीर जखमींना आणि अन्य एका व्यक्तीला उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल केले.

यातील जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. अपघातानंतर चार वाहनांपैकी एक दुचाकी आणि एक कार नदीपात्रात कोसळली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर नदीपात्रात फारसे पाणी नसल्याने जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तर अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या अपघाताच्या थराराने प्रत्यक्षदर्शीच्या काळजाचा ठोकाच चुकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT