Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपूर हादरलं! एकाच रात्री दोन खून

नागपुरात एकाच रात्री खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

मंगेश कचरे

Nagpur News: गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना यश आले होते. मात्र, नागपुरात एकाच रात्री खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

नागपुरात (Nagpur) एकाच रात्री खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे खून झाले आहेत. वयक्तिक वादातून खुनाच्या या घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यातील पहिली घटना पाचपावली परिसरातील राणी दुर्गावतीनगर चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. 25 वर्षीय उमेश नंदेश्वर असे पाचपावलीमध्ये खून झालेल्या मृताचे नाव आहे. जुन्या वादाच्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. (Nagpur Crime News)

तर खुनाची दुसरी घटना यशोधानगर येथील विनोबा भावेनगर परिसरात घडली आहे. या घटनेत धिरज चुटेलकर या तरुणाचा खून झाला असून त्याचा मित्र राजेश मन्ने गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही चाकूने वार करून त्यांना जखमी केले होते. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी मेयो रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT