Ahilya Nagar  Saam tv
महाराष्ट्र

Ahilya Nagar Crime : लघुशंकावरून वाद; दोन जणांना लोखंडी रॉड आणि दांडक्याने मारहाण, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

Ahilya Nagar Crime News : लघुशंकावरून वाद झाल्यानंतर दोन जणांना लोखंडी रॉड आणि दांडक्याने मारहाण झाली.

Vishal Gangurde

सुशील थोरात, साम टीव्ही

Ahilyanagar news : अहिल्यानगरमध्ये लंघुशंकेच्या कारणावरून वाद टोकाला गेल्याची घटना घडली. लंघुशंकावरून दोन जणांना लोखंडी रॉड, दांडक्याने मारून दोघांचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील वाटेफळ येथे ही घटना घडली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. दोन जणांना मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत बापू चौधरी यांनी दिलेले फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, सोन्या उल्हारे, धरम महारनवर, अजय साबळे, नारायण कोळेकर यांच्यासह एका महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

भाऊसाहेब चौधरी हे वाटेफळ येथील सर्व्हिस रोडवरील बसस्टँडवर दीपक कराळे याची वाट पाहत असताना लघुशंका आल्याने ते बसस्टँडचे आडोशाला लघुशंका करण्याकरिता गेले. यावरून वाद होऊन बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी त्यांचा वाद सोडवण्याकरता दोघे आले. यावेळी वेदांत चौधरी, दीपक कराळे यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

सोनईत कोयत्याने हल्ला

अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अक्षय थेटे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने सोनई शहरातील नागरिक धास्तावले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नगरमध्ये कोयता गँगची दहशत पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT