Santosh Parab Attack Case Saam Tv
महाराष्ट्र

Kankavali: संतोष परब हल्ला प्रकरणी पुण्यातील दाेघांना अटक; आज न्यायालयात नेणार

काही संशयित आराेपींनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करुन ताे मिळविला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : संतोष परब (santosh parab) यांच्यावरील हल्ल्यातील आणखी दाेन संशयित आरोपींना कणकवली (kankavali) पोलिसांनी (police) अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवनुरे आणि धीरज व्यंकटेश जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (santosh parab case latest marathi news)

हे दाेन्ही संशयित आराेपी पुण्याचे (pune) रहिवासी आहेत. संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्यासह एकूण ११ संशयितांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी काहींनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केले हाेते.

काही संशयित आराेपींनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करुन ताे मिळविला हाेता. दरम्यान गुरुवारी अटक केलेल्या पुण्यातील दोन्ही संशयित आरोपींना आज (शुक्रवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पाेलिसांच्या सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT