tuljapur saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Bandh News : दर्शन मंडपाच्या इच्छित जागा निश्चितीसाठी तुळजापूरात कडकडीत बंद (पाहा व्हिडिओ)

tuljabhavani temple darshan mandap issue : आजच्या बंदमुळे भाविकांची काही अंशी गैरसाेय झाली आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljabhavani Temple Development Plan : तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादानंतर केलेल्या आवाहनानूसार आज (बुधवार) तुळजापुर शहरात बंद पाळण्यात येत आहे. दर्शन मंडप हा घाटशिळ येथे नकाे अशी भूमिका घेत पुजारी, व्यापारी व स्थानिक नागरिकांनी बंदचे आवाहन केले हाेते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. (Maharashtra News)

तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यात दर्शन मंडप हा घाटशीळ येथे हाेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे. दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापारी यासह स्थानिक (tuljapur) नागरिकांचे नुकसान होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

त्यातूनच आज तुळजापुर शहर बंद ठेवण्यात आले आहे. महाद्वार परिसरातील सर्व दुकाने तसेच छाेटे छाेटे व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवले आहेत. याबराेबरच शहरातील व्यावसायिकांनी देखील बंदमध्ये सहभागी हाेत दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथेच व्हावा यासाठी पाठींबा दर्शविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT