tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival saam tv
महाराष्ट्र

Navratri : भाविकांनाे ! तुळजाभवानीच्या दर्शनास जाणार आहात ? वाचा महत्वपुर्ण निर्णय

कोविडचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे तुळजापूरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Tulja Bhavani Mandir : तुळजापुरात (tuljapur) नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सध्या मंदिर आणि परिसराची साफसफाई सुरु आहे. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु आहेत. याबराेबरच आकर्षक विद्युत रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यंदा उत्सव माेठ्या उत्साहात आणि जल्लाेषात साजरा करण्यासाठी भाविक आतूरलेले आहेत. (Navratri Festival 2022 Latest Marathi News)

गेली दाेन वर्ष काेराेनाच्या निर्बंधांमुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. आता निर्बंध उठले आहेत. त्यामुळे यंदाच्या उत्सवासाठी (navratri festival) तुळजापूरात भाविकांची माेठी गर्दी हाेणार असल्याचे स्पष्ट आहे. तुळजापूर शहरात हाेणारी गर्दी लक्षात घेता पाेलिसांच्यावतीने बॅरिगेट्स लावण्याचे काम सुरु झाले आहे.

येत्या 26 सप्टेंबर पासून तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. हा उत्सव अश्विनी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. यादरम्यान दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात. यंदा भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तुळजाभवानी मंदिर (tuljabhavani mandir) तब्बल 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना नवरात्रात तुळजाभवानीचे दर्शन घेता आले नाही. मात्र यावर्षी कोविडचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मंदिर बावीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेऊन नवरात्र उत्सवाची प्रशासनानं तयारी सुरू करुन भाविकांना आनंदाची बातमी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Immunity Power : पावसाळ्यामध्ये इम्यूनिटी कशी वाढवावी ?

Navi Mumbai: सुरक्षा रक्षकाच्या बुटातून निघाला कोब्रा, फणा काढून बाहेर आला अन्...; पाहा खतरनाक VIDEO

Kalyan : भाड्यावरून रुग्णवाहिका चालकांमध्ये जुंपली; तीन तास मृतदेह शवगृहात पडून, केडीएमसीच्या रुग्णालयाबाहेरचा प्रकार

Unhealthy Monsoon Foods : पावसाळ्यात 'या' ५ गोष्टी खाणं तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं!

Shravan 2025: आयुर्वेदानुसार श्रावणात कांदा आणि लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT