Bus Accident  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; बस रस्त्याच्या मधोमध उलटली, एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जमखी झाल्याची माहिती मिळत आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा  अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जमखी झाल्याची माहिती मिळत आहे.

राही ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस नागपूरहून औरंगाबादला जात असताना देऊळगावजवळ बसला अपघात झाला. बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. (Latest Marathi News)

प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT