IPS Exam Saam TV
महाराष्ट्र

IPS Officer Transfer: लोकसभा निवडणुकीआधी राज्यात मोठे फेरबदल; तब्बल 58 आयपीएस ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्या

IPS Officer Transfer List: राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यात तब्बल 58 आयपीएस ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्या करण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra IAS Officer Transfer:

राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यात तब्बल 58 आयपीएस ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर आयपीएस अधिकारी रविंद्र सिंघल यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तवपदी नियक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागने याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत अनिल कुंभारे यांची सहआयुक्त (वाहतूक) तर ठाणे शहरात ज्ञानेश्वर चव्हाण यांची सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईत एन.डी.येनपुरे यांची सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्य गुप्तचर विभागाचे (SID) सहआयुक्त असलेले शिरीष जैन यांना पदोन्नती देऊन एसआयडी आयुक्त नियुक्त करण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

एम राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी, तर माजी आयुक्त राजेंद्र माने यांची महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे (ग्रामीण) एसपी अंकित गोयल यांची गडचिरोली विभागात पदोन्नती करून बदली करण्यात आली आहे. नाशिक (ग्रामीण) एसपी शहाजी उमप यांची मुंबईला अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) म्हणून बदली करण्यात आली. उमप यांच्या जागी नाशिक (ग्रामीण) एसपी म्हणून विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली असून ते ठाणे (ग्रामीण) एसपी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT