ashadhi ekadashi train, pandharpur News, Ashadi Wari 2022 News Updates saam tv
महाराष्ट्र

Ashadi Wari 2022: आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेचे विशेष नियाेजन; जाणून घ्या तुमच्या गावातून सुटणारी रेल्वे

विठुरायाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

संजय जाधव

बुलडाणा : आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) निमित्त पंढरपूरला (pandharpur) जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने (central railway) विशेष रेल्वे (train) गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खामगाव - पंढरपूर स्पेशल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खामगाव -पंढरपूर आषाढी एक्स्प्रेस स्पेशलचा समावेश आहे. (Ashadhi Wari 2022 latest Marathi news)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार खामगाव -पंढरपूर स्पेशल (गाडी क्र. ०११२१) ७ व १० जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगाव येथून रवाना होऊन दुपारी १.२५ वाजता भुसावळ तर दुसर्‍या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपुरला पोहचणार आहे. याशिवाय नागपूर - पंढरपूर, नागपूर-मिरज, मिरज - पंढरपूर आणि नागपूर - पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे.

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. तसेच विठुरायाचे (vitthal) दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT