sangli News  Saam tv
महाराष्ट्र

Freight Train Derails : सांगलीत रेल्वे दुर्घटना! मालवाहतूक बोगी दुसऱ्यांदा रुळावरून घसरली, मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

Freight Train Derails News : सांगलीत रेल्वे दुर्घटना घडली आहे. मालवाहतूक बोगी दुसऱ्यांदा रुळावरून घसरली आहे. मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीत मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सांगलीच्या मिरजेत मालवाहतूक बोगी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मिरजमध्ये दुसऱ्यांदा बोगी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मिरज,पुणे,मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक दोन तासांपासून ठप्प झाली होती. मालवाहतूक बोगी रुळावरून घसरल्यानंतर लोकांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली.

अन् भोंगा वाजला

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील मिरज रेल्वे स्टेशन गुड शेडजवळ मालवाहतूक करणारी बोगी आज शुक्रवारी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी दुपारी सुमारास घटना घडल्यानंतर रेल्वे अलर्ट करणारा भोंगा वाजला. त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी गुज शेड रेल्वे मार्गावर धाव घेतली

हुबळीकडून पुण्याकडून मालवाहतूक रेल्वे जात असताना एका बोगीची चाके रुळावरून घसरली. या घटनेमुळे मिरज-पुणे-मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुमारे दोन तास ठप्प झाल्या होत्या. रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. काल रात्री देखील एका बोगीची चाके रुळावरून घसरल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

SCROLL FOR NEXT