Sambhajinagar Saam
महाराष्ट्र

Sambhajinagar: कुटुंबासोबत जेवण केलं, घरी जाऊन आयुष्य संपवलं; २५ वर्षीय तरूणीनं घेतला टोकाचा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar mysterious case: मयुरी विलास मगरे या तरूणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरूणीनं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अस्पष्ट आहे. पोलीस तपास करीत आहेत.

Bhagyashree Kamble

एका २५ वर्षीय तरूणीनं भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. मुळची हर्सूल येथील तरूणी कामानिमित्त सिडको एन - ९ भागात भाड्याच्या घरात राहत होती. हर्सूल येथे कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर ती भाड्याच्या घरात गेली आणि टोकाचं पाऊल उचललं. तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मयुरी विलास मगरे असे मृत तरूणीचे नाव आहे. ती २५ वर्षांची होती. ती छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल या गावात राहत होती. मात्र, कामानिमित्त ती सिडको एन - ९ भागात भाडाच्या घरात राहायला गेली. मयूरी आधी हर्सूल गावात आपल्या घरी गेली. तेथे तिनं कुटुंबासोबत जेवण केले. जेवण केल्यानंतर ती सिडको एन - ९ भागातील तिच्या भाड्याच्या घरात आली.

भाड्याच्या घरात येत तिनं गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्या लोकांनी मयूरी खूप वेळ बाहेर आली नाही म्हणून कॉल केला. मात्र, मयूरीनं कॉल उचलला नसल्यामुळे त्यांनी दरवाजा ठोठावला. मयूरी दरवाजा उघडत नसल्याचं पाहता त्यांनी खिडकीतून पाहिले. तेव्हा तरूणीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना १५ मार्चला उघडकीस आली.

शेजारी राहणाऱ्या मुलीनं आरडाओरडा केला. नंतर याची माहिती तिनं घरमालकासह पोलिसांना दिली. सर्वांनी मयूरीला लटकेलल्या अवस्थेतून काढत घाटी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयूरीच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. मयूरीनं नक्की असं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT