Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur: झोपाळा झाला मृत्यूचा फास! झोका घेताना फास लागला, श्वास गुदमरला; क्षणात चिमुकल्याचा मृत्यू

Kolhapur Boy Dies in Swing Accident Community in Shock: कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील आरे गावात एका चिमुकल्याचा खेळता खेळता मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील आरे गावात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. चिंध्यांनी बांधलेला झोपाळ्यात झोका घेत असताना एका चिमुकलाचा फास लागून मृत्यू झाला आहे. खेळण्यासाठी मुलाने लाकडी जिन्याला चिंधी आणि पट्ट्यांपासून झोपाळा तयार केला होता. त्यावर हा चिमुकला खेळत होता. मात्र, हा खेळ त्याच्या आयुष्यातला अखेरचा ठरला. चिमुकल्याच्या दुर्देवी मृत्यूनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

झोपाळ्यावरून मृत्यूच्या झोळीत

मृत चिमुकल्याचे नाव समर्थ अरूण वरूटे (वय वर्ष ९) असे आहे. समर्थ चौथीच्या वर्गात शिकत होता. घटनेचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. शाळेत परिक्षा देऊन समर्थ घरी आला होता. दुपारी आई वडील कामावर गेले होते. तर, मोठा भाऊ अर्थव दुध आणण्यासाठी दुकानात गेला होता. समर्थ हा घरी एकटाच होता. खेळण्यासाठी मुलाने लाकडी जिन्याला एक झोपाळा तयार केला होता. झोपाळ्यावर झोका घेत असताना दोरी त्याच्या गळ्याला अडकली. त्याचा श्वाल गुदमरला आणि क्षणात समर्थने जगाचा निरोप घेतला.

भावाच्या डोळ्यासमोर भावाचा मृत्यू

अर्थव घरी परतला तेव्हा त्याने हे दृश्य पाहिलं. त्याच्या पायाखालची जमिन सरकली. त्याने किंचाळत घराबाहेर धाव घेतली. त्याच्या आवाजाने शेजारी आणि परिसरातील इतर नागरिकांनी अर्थवच्या घराबाहेर धाव घेतली. समर्थला तातडीने सीपीआर रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मांजरासाठी साठवले होते पैसे

समर्थला मांजर फार प्रिय होते. मांजार आजारी असल्यामुळे त्याला चिकन खाऊ खालण्यासाठी पैसे जमवले होते. त्या दिवशी तो मांजरीसाठी चिकन आणणार होता. भाऊ अर्थवने त्याला सोबत चल असं म्हटलंही होतं. पण थोडा वेळ खेळून येतो म्हणत समर्थ झोपाळ्याच्या दिशेनं गेला. आणि याच निर्णयामुळे त्याचा शेवट झाला. या घटनेनंतर आरे गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT