Jalgaon News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon News: उपचारासाठी लाखोंचा खर्च, इंजेक्शन देताच प्रकृती खालावली; २ चिमुकल्यांनी सोडले प्राण, आई-वडील रडून रडून बेहाल

Toddlers Die Hours After Costly Injection: जळगावमध्ये दोन चिमुकल्यांचा इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मृत्यू झाला. मुलांच्या उपचारासाठी पालकांनी लाखोंचा खर्च केला. मुलांच्या जाण्यामुळे धक्का बसलेल्या पालकांचे रडून रडून बेहाल झाले आहे.

Priya More

संजय महाजन, जळगाव

पुण्यामध्ये रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे या गरोदर महिलेने आपले प्राण गमावले. ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमधील जावळे रुग्णालयात दोन चिमुकल्यांना इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मृत्यू झालेल्या एका मुलाच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उपचारासाठी मोलमजुरी करून पैसे जमा केले तर दुसऱ्या मुलाच्या पालकांनी व्याजाने पैसे घेतले. मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान महागडे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावामधील जावळे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना महागडे इंजेक्शन दिल्यानंतर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील जावळे रुग्णालयात येथे सेरेब्रल पाल्सी या आजारावर उपचारासाठी आलेल्या अडीच वर्षी आणि तीन वर्षीय मुलांना इंजेक्शन देण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः चार तासानंतर दोन्ही बालकांना त्रास व्हायला सुरूवात झाली. यामधील एका मुलाचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. तर दुसऱ्या ३ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या एका चिमुकल्याच्या पालकांनी याबाबत पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.

सेरेब्रल पाल्सी या आजाराच्या या दोन्ही मुलांवर उपचार करत असताना त्यांना butox नावाचे इंजेक्शन तसेच भूल संदर्भातील औषधे देण्यात आली होती. शुद्धीवर आल्यावर चार तासानंतर दोन्ही बालकांची प्रकृती गंभीर झाली. एका मुलाचा दुसऱ्या रुग्णालयात हलवताना रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलाचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान दोन्ही मुचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याबाबत आम्ही सुद्धा शॉक मध्ये असून पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर कारण कळू शकेल. याप्रकरणात आम्ही हलगर्जीपणा केला असल्याचे निष्पन्न झाले तर जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जाणार अशी प्रतिक्रिया जावळे हॉस्पिटल संचालक डॉ. हर्षल जावळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT