satara news, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023
satara news, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 saam tv
महाराष्ट्र

Satara News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात; जाणून घ्या वाहतुकीतील बदल

Siddharth Latkar

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्यापासून (ता. 18 जून) 23 जून पर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. (Maharashtra News)

हा पालखी सोहळा (Ashadhi Wari 2023) पुणे जिल्ह्यातुन सातारा 18 जूनला पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 23 जूनला सोलापूर जिल्हयात जाणार आहे.

हा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सेाहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने) खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर 18 जून ते 23 जून 2023 या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

असा आहे वाहतुकीमधील बदल

शनिवार (ता.17 जून) सकाळी 6.00 पासून ते 21 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे.

17 जून 2023 रोजीचे रोजीचे सकाळी 6.00 वा. पासून ते दि.20 जून 2023 रोजीचे 24.00 वा पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे.

17 जून 2023 रोजीचे सकाळी 9.00 वा. पासून ते दि.22 जून 2023 रोजीचे दुपारी 13.00 वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.

17 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 ते दि.21 जून 2023 रोजीचे 24.00 वा.पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

दि.21 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पर्यंत नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. नातेपुते कडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी -सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 14.00 वा पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.

पालखी सेाहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये जा करतील याची इतर वाहन धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दिलासा; रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या महिन्यापर्यंत असणार निशुल्क

Girls Student: आनंदाची बातमी! व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात मोठी सवलत; ५० टक्क्याऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ

Marathi Live News Updates: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात

Robot News : धक्कादायक! कामाच्या ताणामुळे चक्क रोबोटने उचललं टोकाचं पाऊल!

Hing Water Benefits: रात्री झोपण्यापूर्वी हिगांचे पाणी प्यायल्यास काय होते?

SCROLL FOR NEXT