karad, satara, karad malkapur bridge saam tv
महाराष्ट्र

Karad : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; जाणून घ्या वाहतुक मार्गातील नवा बदल

यापुर्वी ०२/०२/२०२३ राेजी एक अधिसुचना काढण्यात आली हाेती.

Siddharth Latkar

Karad : साताराहून (satara) काेल्हापूरकडे (kolhapur) जाताना असलेला मलकापूर (malkapur) येथील उड्डाणपुल (bridge) पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम 25 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता म्हणून कराड (karad) व मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील वाहतुक मार्गात नव्याने बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (ता. दाेन मार्च) हाेत आहे.

पाेलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुक मार्गातील बदलाबाबतचा काढलेला आदेश असा

सातारा कडे जाणारी जड वाहतुक भादी हार्डवेअर समोरील यू टर्न ऐवजी कोल्हापूर नाकामार्गे ढेबेवाडी फाटा येथे यू-टर्न घेवून कोल्हापूर नाका मार्गे वारुंजी फाटयावरील ओव्हरब्रीजवरुन सातारा बाजुकडे जातील. (Pune Bangalore National Highway)

हायवेवरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतुक अक्षता मंगल कार्यालय येथून सेवारस्त्यावर येवून गंधर्व हॉटेलपर्यंत सेवारस्त्याने जावुन पुन्हा हायवेला मिळतील. (Breaking Marathi News)

कोल्हापूर ते साताराकडे जाणारी वाहने कोयना औद्योगिक वसाहत, मलकापूर येथे सेवारस्त्यावर येवून सरळ सेवारस्त्याने जावून पंकज हॉटेलच्या पश्चिम बाजूस हायवेला मिळतील व तेथून कोयना नदीवरील पुलावरुन सातारा कडे जातील.

ढेबेवाडी फाट्याचे उत्तरेस असलेला व मलकापुर फाटा येथील असलेला भुयारी मार्ग बंद करण्यात येईल. (karad bridge demolition news)

यापुर्वी दि.०२/०२/२०२३ रोजी जा.क्र ५७/२०२३ जिवानिशा / वाहतुक अधिसुचना पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा दि.०२/०२/२०२३ अन्वये दिलेल्या मुद्दा क्रमांक ०३ मधील ( ब ) मधील भादी हार्डवेअर समोरील यु टर्न रद्द करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

Mhada Lottery 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; कुठे नोंदणी अन् अर्ज कराल? जाणून घ्या

Kapil Sharma: रिंग ऐकली नाहीतर पुढचा हल्ला मुंबईत; कॅफेवरील गोळीबारनंतर कपिल शर्माला धमकी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये मिळणार, महायुतीतील मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics: युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले, युतीबाबत इंडियाच्या अटी-शर्ती नाहीत'

SCROLL FOR NEXT