Khambatki Ghat road closed saam tv
महाराष्ट्र

Khambatki Ghat News: पुण्याला निघालात? खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक दाेन तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या कारण

Pune Bangalore National Highway : आज पहाटे या घाटातील वाहतुक तब्बल साडे तीन तासानंतर वाहतुक सुरळीत झाली हाेती.

Siddharth Latkar

Satara Breaking News : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटाजवळ (khambatki ghat latest marathi news) आज (शुक्रवार) पुन्हा एकदा बोगद्यात कारवर खांबाचा अँगल पडल्याने अपघात झाला. या भागात पुन्हा दुर्घटना हाेऊ नये यासाठी आज (ता. १८) तातडीने खंबाटकी बोगदयाचे (khambatki tunnel) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे दाेन तास खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. (Maharashtra News)

पाेलिस दलाने दिलेल्या माहितीनूसार वेळे येथील खंबाटकी बोगदयाचे दुरुस्तीचे कामकाज आज (शुक्रवार) दुपारी अडीच ते साडे चार यावेळेत करण्यात येणार आहे. तरी सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग खंबाटकी घाट मार्गे आहे. जड वाहनांकरिता पुणे बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक दाेन तासांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सदर वेळेत पुणे बाजूकडे प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT