Crime  Saam Tv News
महाराष्ट्र

Shevgaon Crime: दुचाकीच्या साखळीनं मारलं, अंगावर गाडी घातली; ट्रॅक्टर लावण्याच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण

Couple Attacked Over Tractor Parking in Shevgaon: किरकोळ वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण, पोलिसांकडून पीडितांवरच गुन्हा दाखल. परिसरात एकच खळबळ.

Bhagyashree Kamble

सुशील थोरात, साम टीव्ही

शेवगाव तालुक्यातील वाघोली गावात एक संतापजनक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून एका जोडप्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर उभा केल्याच्या कारणावरून हा वाद चिघळला आणि पाच ते सहा जणांनी मिळून दाम्पच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात पती पत्नी जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संपत रंगनाथ वांढेकर आणि त्यांची पत्नी आशाबाई संपत वांढेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही गावगुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. घटनेच्या दिवशी अशोक देवराव कराळे यांचा ट्रॅक्टर डिझेल संपल्यामुळे वांढेकर यांच्या घरासमोर उभा करण्यात आला होता. या कारणावरून वांढेकर दाम्पत्य आणि कराळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

कराळे आणि ४ ते ५ जणांनी मिळून दुचाकीची चेन, वायर रोप इत्यादी वस्तूंचा वापर करून वांढेकर पती पत्नीला बेदम मारहाण केली. आरोपी मारहाणीवरच थांबले नाही. त्यांनी आशाबाईंवर दुचाकी अंगावर घालण्याचाही प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पती पत्नीवर सध्या अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी वांढेकर दाम्पत्याच्याच विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे गावात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच गावकऱ्यांनी पोलिसांच्या भूमीकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT