Nandurbar Road saam tv
महाराष्ट्र

Shahada News : रस्त्यांची दुरवस्था दूर करा ! उद्या शहादा तालुक्यात सर्वपक्षीय आंदोलन

खराब रस्त्यांमुळे अपघातात वाढ हाेऊ लागली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Shahada News : शहादा तालुक्यातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी उद्या (ता. 5 ऑक्टोबर) तालुक्यात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येणार आहे. शहादा येथे मुख्य आंदाेलन हाेणार असून नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra News)

शहादा तालुक्यातील मुख्य रस्ते म्हणून ओळख असलेल्या शहादा दोंडाईचा शहादा शिरपूर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे तालुक्यात अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देण्यात आली मात्र राज्य शासनाच्या वतीने दुर्लक्ष होत असल्याने पाच ऑक्टोबर रोजी शेतकरी संघर्ष समितीचे नेते अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे.

सरकार रस्त्यांची दुरुस्ती कधी करेल हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी का लक्ष दिले जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उद्या (ता. 5 ऑक्टोबर) तालुक्याभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन केल जाणार आहे.

दरम्यान मुख्य आंदोलन शहादा येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघर्ष समितीचे नेते अभिजीत पाटील यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

SCROLL FOR NEXT