Today Maharashtra Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : थंडी गायब उकाडा वाढला! ६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, राज्यात आज कुठे कसं हवामान?

Today Maharashtra Weather Update News : राज्यात किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. ६ जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असून तापमानात चढउतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडी कमी होऊन उकाडा जाणवत आहे

  • ६ जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज

  • तापमानातील चढउतारामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या

  • बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम

Today Weather News राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. तसेच अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी दाट धुकं आणि रात्रीच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच २३ जानेवारी रोजी राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सुमारास गारठा आणि दुपारी उन्हाचा कडाका असणार आहे. तसेच पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या ६ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात झालेली घट आजही कायम आहे. पुढील २ दिवस राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. धुळे, नाशिक, निफाड येथे किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या वर गेल्याने थंडी कमी होऊन उकाडा जाणवत आहे.

तापमानात सतत होणाऱ्या चढ उतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आहे. दरम्यान याचा फटका शेतकरी वर्गाला देखील बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर देखील गंभीर परिणाम होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक निर्णय! आता व्हॉट्सॲपवर मिनिटांत मिळणार पास; जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT