Saamana Editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे?; सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे

Ruchika Jadhav

Saamana Editorial On Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या आधी भाजपकडून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अजित पवारांच्या प्रवेशाला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. अशात आता अजित पवारांवरील हे सर्व आरोप खोटे होते की खरे? असा सवाल करत शिंदे-फडणवीस सरकारवर देखील सामना अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आलेत. (Latest Marathi News)

साखर कारखान्यात 178 कोटींचा घोटाळा

आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

त्यांचे गुन्हे म्हणजे प्रसादच असतो

भाजपचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा ‘मनी लाँडरिंग’ घोटाळा करून ठेवला. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्यात 178 कोटींचा घोटाळा केला, पण संत, महात्मे व युगपुरुषांच्या चुका शोधायच्या नसतात. त्यांचे गुन्हे म्हणजे प्रसादच असतो. महाराष्ट्राला सध्या तो प्रसाद मिळाला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेच, पण हे सगळे कलियुगातील ‘संत’ आहेत. त्यांच्या पायाचे तीर्थ सध्या भाजप प्राशन करीत आहे. महाराष्ट्रासाठी ते विष आहे!, अशा शब्दांत भाजपसह अजित पवारांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

कोविड सेंटर प्रकरणात साप समजून भुई धोपटण्याचे प्रकार सुरू आहेत. ज्यांनी कोरोना काळात लोकांचे प्राण वाचवले, भुकेल्यांना खाऊ-पिऊ घातले, घरे जिवंत ठेवली ते अधिकारी, संस्था, कार्यकर्ते यांच्या मागे भाजपपुरस्कृत ‘ईडी’ लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला ‘मनी लाँडरिंग’ची कोट्यवधीची प्रकरणे दाबून अशांना मंत्रीपदे देण्याची अतिभ्रष्ट प्रकरणे घडत आहेत. यावर आता आम्ही बोलण्याऐवजी भाजपमधील भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या शिलेदारांनी बोलायला हवे, असं सामना अग्रलेखात (Saamana Editorial) म्हटलं आहे.

भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा

अजित पवार (Ajit Pawar) हे सध्याच्या राजकारणातील ‘संत’ आहेत. तर भुजबळ, हसन मुश्रीफ, वळसे पाटील हे ‘महात्मे’ बनले आहेत. याविषयी सामान्य जनांच्या मनात आता कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली व त्या हमीनुसार मुश्रीफ वगैरे महात्मे तुरुंगातच जाणार होते, पण आता न्यायालयाने त्यांना जामिनावर बाहेर ठेवले व इतरांच्या फाईलींना ‘चाप’ लावला. भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा, कायदा तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, सामनातून अशा शब्दांत भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT