Maharashtra Monsoon Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण व घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात विजांसह येलो अलर्ट जारी. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट

  • मराठवाड्यात विजांसह येलो अलर्ट जारी

  • विदर्भात बहुतांश ठिकाणी तुरळक सरींची शक्यता

  • हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह मुसळधार सरींची शक्यता वर्तवली असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची नोंद होणार असून काही ठिकाणी उघडिपीसह ऊन-सावल्यांचा खेळ कायम राहणार आहे.

काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. याच कालावधीत डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३१.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गुरुवारी दिवसभरात अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच होता. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या पावसालाही सुरुवात झाली होती.

आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार सरींचा अंदाज आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींची शक्यता वर्तवली गेली आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांतील नागरिकांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. दुसरीकडे, विदर्भ विभागात मात्र बहुतांश भागात आकाश उघडे राहील, काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT