Titwala Ganpati Temple Saam tv
महाराष्ट्र

Titwala Ganpati Temple: टिटवाळा गणपती मंदिर परिसरात धक्कादायक घटना; नारळ विक्रेत्याने तलावात उडी मारत संपविले जीवन

Titwala News : टिटवाळा गणपती मंदिर परिसरात धक्कादायक घटना; नारळ विक्रेत्याने तलावात उडी मारत संपविले जीवन

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
टिटवाळा
: टिटवाळा मंदिरॅट सकाळी दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी जमत असतानांच धक्कादायक घटना समोर आली. (Titwala) मंदिर परिसरातील तलावात सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. (Breaking Marathi News)

टिटवाळा मंदिर परिसरातील तलावात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. गणेश दलाल असे मयत इसमाचे नाव आहे. टिटवाळा परिसरात राहणारे गणेश दलाल यांचा गणपती मंदिर (Ganpati temple) परिसरात हार, नारळ विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. गणेश यांनी या तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललेले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  

पोलिसांकडून तपस सुरु 

मंदिर तलाव परिसरातील घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गणेश यांनी आत्महत्या का केली याचा तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT