सावकाराच्या जाचाला कंटाळून सलून चालकाची गळफास घेऊन आत्महत्या! संजय जाधव
महाराष्ट्र

सावकाराच्या जाचाला कंटाळून सलून चालकाची गळफास घेऊन आत्महत्या!

बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे राहणाऱ्या सलून चालकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून गलफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे राहणाऱ्या सलून चालकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून गलफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या पत्नीने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

गणेश लेंडस्कर (२५, रा. जळगाव जामोद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशचे शहरातच सलूनचे दुकान आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गणेशने मलकापूर येथील सोपान तायडे व खामगाव येथील विठ्ठल दळी यांच्याकडून सलून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले होते.

कर्जाची परतफेड न झाल्याने दोघेही गणेशला वारंवार रात्री बेरात्री फोन करून पैशाचा तगादा लावत होते. त्यामुळे गणेश नेहमी तनावात राहत होता. दोघांच्या छळाला व जाचाला कंटाळूनच गणेशने राहत्या घरात गळफास घेतला. पत्नीच्या तक्रारी वरून सोपान तायडे व विठ्ठल दळी यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT