Timbati Awale, sangli news, sangli police saam tv
महाराष्ट्र

Sangli News : साेनीत सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू, पार्टीनंतर घडली दुर्देवी घटना

दरम्यान या घटनेनंतर सांगली पाेलिस दलात शाेककळा पसरली आहे.

विजय पाटील

Sangli News : पार्टीनंतर पोहोयला गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगली (sangli) जिल्ह्यात घडल्याचे समाेर आले आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे ही घटना घडली आहे. होमगार्ड चालकांची परिक्षा घेण्यासाठी गेलेल्या सहायक पाेलिस उपनिरीक्षकचा घटनेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : भोसे येथे सांगली होमगार्ड चालकांची परिक्षा होती. या परिक्षेसाठी सांगली पोलिस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परिक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते.

या पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या घटनेनंतर सांगली पाेलिस दलात शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT