पठारपूर शिवारात वाघाचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण संजय राठोड
महाराष्ट्र

पठारपूर शिवारात वाघाचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पठारपूर शिवारातील शेतात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: वणी तालुक्यातील गाव खेड्यात सध्या वाघाचा वावर वाढलाय. शेत शिवारात होत असलेल्या वाघ दर्शनाने शेतकरी शेतमजूर भयभीत झाले असतांनाच आता पठारपूर शिवारातील शेतात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Tiger roaming in Patharpur Shivara; An atmosphere of fear among the villagers)

हे देखील पहा -

तालुक्यातील पठारपूर शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे गाव आहे. काल रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला. गजानन काळे हे शेतात गेले असता तेव्हा त्यांना वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी तालुक्यात वारंवार वाघाचा जनावरांवर होत असलेले हल्ले शेतकऱ्यानंसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या महिन्यात दोन शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या वाघाने पडला होता, तर शेतात जाणाऱ्या युवकाला वाघ आडवा झाल्याने त्याला झाडावर चढावे लागल्याची घटना घडली होती. दरम्यान वनविभागाच्या चमुने घटनास्थळी भेट देऊन वाघाच्या ठशाची पाहणी केली आणि नागरिकांना धीर दिला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT