Arrest Saam Tv
महाराष्ट्र

वाशिम, नांदेड, परभणी, यवतमाळातील पेट्रोल पंपावर चोरी; हिंगाेलीचे ३ अटकेत

असेंगाव पोलिसांनी केली कारवाई.

गजानन भोयर

वाशिम : पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट करणाऱ्या तिघांना मुद्देमालासह असेंगाव पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी नांदेड (nanded) ,परभणी (parbhani), यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात पेट्रोल पंपावर चोरी (petrol theft) केल्याचं निष्पन्न झाले आहे. (washim latest marathi news)

वाशिम-मंगरूळपीर रस्त्यावरील बीटोडा येथील पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असेंगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्रिन्स होलपदे, देवानंद धुधमोगरे, एकनाथ चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिन्ही संशयित आराेपी हिंगोली जिल्ह्यातील आहेत. दरम्यान असेंगाव पोलिसांना तपासात या तिघांनी नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT