Solapur Crime News Updates Saam Tv
महाराष्ट्र

गुंडास अटक करताना कुटुंबीयांचा पोलिसांवर हल्ला; ३ महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : तडीपार बॉबी शिंदेला अटक (arrest) करत असताना पोलिसाच्या (police) हाताला चावा घेऊन मारहाण केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (dr babasaheb ambedkar jayanti) मिरवणुकीच्या दरम्यान आंबेडकर चौकात घडला. (Solapur Crime News Updates)

सचिन ऊर्फ बॉबी शिंदे, किर्ती शिंदे, सुलोचना शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे आणि अन्य दोन अनोळखी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातून (solapur) मिरवणूक काढण्यात आली होती. शहर पोलीस आयुक्तालयाने दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सचिन ऊर्फ बॉबी शिंदे हा मिरवणुकीत आढळून आला. पोलिसांनी त्याला मिरवणुकीत पकडले आणि पोलीस ठाण्यात नेत असताना त्याच्या कुटुंबातील लोकांनी तीव्र विरोध केला.

सर्वजण बॉबीला कारवाईला घेऊन जाऊ नका असे म्हणत पाेलिसांशी हुज्जत घालू लागले. पोलीस नाईक रविराज काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना सर्वजण झटापटी करू लागले. रविराज काळे यांच्या शर्टाची गच्ची पकडून ओढाओढी करू लागले. पोलिसांच्या डाव्या हाताला चावा घेतला, बॉबीला सोड नाही तर बघ असे म्हणत शिवीगाळ करू लागले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला अशी फिर्याद पोलीस नाईक रविराज काळे यांनी संबंधितांविराेधात दिली आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT