Bhandara News, lakhandur news saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : महिला बचत गटाच्या उपाेषणकर्त्यांची प्रकृती खालवली; लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात महिला दाखल

मागण्यांची पुर्तता हाेईपर्यंत बेमुदत उपोषण सुरुच राहणार असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : लाखांदूर (lakhandur) तालुक्यातील विविध महिला बचत गटा अंतर्गत अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना ताजा पोषण आहार स्वखर्चाने पुरविले जाते. अंगणवाडीतील मुलांचा अन्न शिजवण्यासाठी लागणारा इंधन बिल देखील शासनाकडून दिला जात नाही. यामुळे महिला बचत गट आक्रमक झाले आहेत. (Maharashtra News)

प्रति बालक पोषण आहाराचा दिला जाणारा खर्च अल्प प्रमाणात असल्याचा आरोप महिला बचत करु लागला आहे. त्यातच मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून महिला बचत गटांना शासनाकडून अनुदान दिले गेले नसल्याने महिलांना विविध आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने तालुक्यातील सर्वच महिला बचत गटाच्या महिलांनी लाखांदूर येथील पंचायत समिती कार्यालया पुढे बेमुदत उपोषणाला (aandolan) सुरुवात केली आहे.

१८ जून पासून नियमित सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान साेमवारी प्रभा मुद्दलकर यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याच दिवशी वनिता केळराम हेमणे (४३) रा मासळ, बकुबाई नानाजी ठाकरे (५०) रा ओपारा यांची देखील प्रकृती खालावली.

या आंदाेलनातील अन्य महिलांनी तिघींना महिला पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर (bhandara) लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT