Gram Panchayat Elections 2022, beed Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections 2022 : 'दबाव, दहशत सहन केली जाणार नाही'

या निवडणुकीच्या अनुषंगाने दाेनशे पेक्षा जास्त पाेलिस अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत.

विनोद जिरे

Gram Panchayat Elections 2022 : बीड जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. काेठेही गडबड, गोंधळ हाेऊ नये यासाठी अशा लाेकांवर पाेलिसांचे (police) लक्ष राहणार आहे. बीड जिल्ह्यात तब्बल तीन हजार पाचशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी राहणार आहे. यामध्ये दाेनशे पेक्षा जास्त अधिकारीही रस्त्यावर उतरणार आहेत. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यात सातशे चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (beed grampanchayat election) उद्या (रविवार) मतदान होत आहे. त्यासाठी बंदोबस्ताची योजना निश्चित करून यादी संबंधित पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (election 2022) होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीला परजिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे.

आज नेमलेल्या ठिकाणी ईव्हीएमसह अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताच्या कामी जावे लागणार आहे. दरम्यान उद्या मतदान होऊन ईव्हीएम मतमोजणी केंद्राच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोच होईपर्यंत पोलिसांना (police) तैनात रहावे लागणार आहे.

दरम्यान पाेलिस दल गावा गावात रूट मार्च काढून शांततेत मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे. बीडच्या (beed) दहिफळ वडमाऊली येथे केज पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान यावेळी शांततेत मतदान करा, दबाव, दहशत आणि चुकीचा प्रकार सहन केला जाणार नाही. प्रशासनाचे सर्व हालचालीवर लक्ष आहे. असाच संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT