बापरे...एकाच झाडावर आढळले तीन विषारी कोब्रा! पहा Viral Video अरुण जोशी
महाराष्ट्र

बापरे...एकाच झाडावर आढळले तीन विषारी कोब्रा! पहा Viral Video

जंगलात भटकंती करणाऱ्या काही युवकांना एकाचवेळी एकाच झाडावर ३ कोब्रा असल्याचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. काळा कोब्रा दिसणे ही दुर्मीळ बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अरुण जोशी

अमरावती : मेळघाटातील जंगलातील एका झाडावर ३ कोब्रा साप (King Kobra Snake) एकाचवेळी दिसून आले. जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या काही युवकांना हे तीन साप नजरेस पडले. दुर्मिळ अश्या या दृश्याला त्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत या घटनेचा त्यांनी व्हिडीओ बनवला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करीत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला.

त्याच्याशेजारी आणखी एक कोब्रा होता. बाजूलाही एक कोब्रा होता. एकाचवेळी एकाच झाडावर ३ कोब्रा असल्याचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. काळा कोब्रा दिसणे ही दुर्मीळ बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तसे जंगल म्हटले की जंगली प्राणी, पक्षी, साप दिसणारच. परंतु, एकाच झाडावर एकाचवेळी तीन-तीन कोब्रा दिसणे हे खरच दुर्मीळ आहे. या आधी अनेक साप आम्ही पाहिले मात्र, अशाप्रकारचे दृश्य हे खरेच आश्चर्यकारक होते असे स्थानिकांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाण्यात पाणीकपातीचं संकट! 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा यादी...

Maharashtra News Live Update: - नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

SCROLL FOR NEXT