Accident News Saam Tv
महाराष्ट्र

तिहेरी अपघातात ३ ठार, ६ गंभीर जखमी; लग्न साेहळ्यास पुण्याला निघाली हाेती CAR

या अपघातामधील जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे (dhule) शहरापासून सुमारे ३० किलाेमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा (मुंबई- आग्रा महामार्गावर) (mumbai agra national highway) झालेल्या अपघातात (accident) तीन जण ठार तस सहा जण जखमी (injured) झाले आहेत. ट्रक, रिक्षा आणि चार चाकी या तीन वाहनांचा रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. (dhule accident latest marathi news)

या तिहेरी अपघातामधील रिक्षा चालक हा ट्रकखाली खूप वेळ तसाच अडकून पडला हाेता. त्याला क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. या अपघातामधील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामधील चार चाकीतील लाेक लग्न समारंभासाठी तरडी या गावातून पुण्याला जात हाेते अशी प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT