nanded, vegetables, truck saam tv
महाराष्ट्र

Accident News : भीषण अपघातात तीन ठार, २० जखमी; स्थानिकांची मदतीसाठी धाव

यावेळी स्थानिक युवक मदतीसाठी धावले.

संतोष जोशी

Nanded Accident News : नांदेड येथे भाजीपाला घेऊन आठवडा बाजारासाठी जाणारा टेम्पोचा झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 20 जण जखमी (injured) झाले आहेत. हा अपघात मुदखेड - हिमायतनगर रस्त्यावरील राजावाडी गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास झाला. (Nanded Latest Marathi News)

या अपघातात महम्मद हफीज महम्मद हुसेन, महम्मद रफीक महम्मद अमिनसाब, महम्मद चाँद महम्मद मिरासाब हे तिघेही ठार झाले आहेत अशी माहिती घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिली. या अपघातात एकूण 20 जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : आज हिमायतनगरचा आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते हे मुदखेड वरून टेम्पो घेऊन निघाले हाेते. या वाहनात कांदा, लसूण, अद्रक इतर भाजीपाला घेऊन ते हिमायतनगर येथे जात हाेते.

रस्त्यात राजावाडी गावाजवळ असताना मोठा खड्डा लागल्याने टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. या अपघातामधील 20 जखमींना स्थानिक नागरिकांनी मुदखेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lack of sleep effects: खरंच रात्री ८ तासांची झोप नितांत गरजेची आहे? ६ तासच झोपलं तर काय होतं? तज्ज्ञांनी सांगितले परिणाम

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Alia Bhatt Birthday : आधी स्टार किड म्हणून हिणवलं; आता आहे बॉलिवूडची क्वीन, एका भूमिकेने रातोरात चमकले नशीब

घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT