belgaum miraj passenger train, railway, passenger train saam tv
महाराष्ट्र

Passenger Train : बेळगाव, मिरज प्रवाशांसाठी खूषखबर; उद्यापासून धावणार तीन पॅसेंजर रेल्वे

यामध्ये प्रवाशांसाठी तर मालवाहतूक आणि इतर साहित्यासाठी दोन डबे असतील असे रेल्वे प्रशासनानं नमूद केले.

विजय पाटील

Belgaum Miraj Passenger Train : कोरोनामुळे (corona) दोन वर्षांच्या खंडानंतर मिरज - बेळगाव मार्गावर आता पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. उद्यापासून (ता. 25 ऑगस्ट) हुबळी मिरज , कॅसलरॉक - मिरज आणि लोंढा मिरज या तीन गाड्या धावणार आहेत. एकूण 29 रेल्वे स्टेशनला आता सहा पॅसेंजर गाड्यांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान वर्षभरापासून सुरू करण्यात आलेली बेळगाव शेडवाळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांत जून 2020 पासून टप्प्याटप्प्याने रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तर वर्षानंतर एक्स्प्रेस गाड्या टप्प्याटप्प्याने सुरु केल्या. मात्र दोन वर्षे उलटली तरी पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. पॅसेंजर गाड्या या सेंट्रल रेल्वे पुणे विभागाच्या असल्यामुळे तसेच त्यांनी गाड्या अन्य मार्गाने वळवल्याने हुबळी विभागाला पॅसेंजर सोडण्यासाठी गाडी उपलब्ध होत नव्हती.

पॅसेंजर गाड्या बंद झाल्यामुळे बेळगाव ते मिरज मार्गावरील सोळा रेल्वे स्टेशन्स ओस पडले होते. बेळगाव - मिरज (miraj) पॅसेंजरच्या अभावाने सुमारे दोन हजारहून अधिक मजुरांचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचेही हाल सुरू होते. त्यामुळे तातडीने पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याची मागणी होत होती. आता गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवाशांसाठी तर मालवाहतूक आणि इतर साहित्यासाठी दोन डबे असतील असे रेल्वे प्रशासनानं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT