talegaon dhamdhere accident news saam tv
महाराष्ट्र

Pune Accident News : तळेगाव ढमढेरेनजीक भीषण अपघात दाेन महिलांसह युवक ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

यावेळी घटनास्थळी माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.

रोहिदास गाडगे

Pune News : पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

याबाबतची मिळालेली माहिती अशी - माल वाहतुक गाडी आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाेलिसांनी आणि घटनास्थळावरुन दिलेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये अनिता बोरुडे, योगिता बोरुडे आणि राजू शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या अपघातात कारमधील एक 17 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान माल वाहतुकीमधील दोन जणांची देखील चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT