नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापले; तीन नगरपंचायतीच्या निवडणुका Saam TV
महाराष्ट्र

नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापले; तीन नगरपंचायतीच्या निवडणुका

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. अर्धापूर नगरपंचायतींसाठी येथे 150, माहूर 140 आणि नायगाव 87 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कांग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम (AIMIM) या पक्षांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. तीन नगर पंचायतीत 17 - 17 जागांसाठी निवडणूक होत असून, 13 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत.

21 डिसेंबरला मतदान 22 तारखेला मतमोजणी होणार आहे. अर्धापूर नगरपंचायतीत पालकमंत्री अशोक चव्हाण, माहुरमध्ये भाजप आमदार भिमराव केराम, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे जोतिबा खराटे यांची तर नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार, कांग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण या नेत्यांनी नगरपंचायत आपल्या ताब्यात यावी म्हणून प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT