Accident Saam Tv
महाराष्ट्र

Washim: पार्डी ताड फाट्याजवळ भीषण अपघात; २ ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

या सर्व जखमींवर शेलुबाजार येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

गजानन भोयर

वाशिम : ओंकारेश्वर - उज्जैन येथून घरी (home) परतत असताना मंगरूळपीर (mangrulpir) तालुक्यातील पार्डी ताड फाट्याजवळ झालेल्या अपघातात (accident) दाेन जण गंभीर तसेच एक जण किरकाेळ जखमी (injured) झाला आहे. (washim latest marathi news)

या अपघाता बाबतची मिळालेली माहिती अशी : ओंकारेश्वर (उज्जैन) येथून घरी परत जात असताना मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड फाट्यानजीक चालकाला डुलकी आल्याने क्रुझर पलटी झाली. यामध्ये आसोला हांडे येथील रहिवासी जखमी झालेत.

यामध्ये माणिक जाधव (वय ६०), रामस्वरुप दास महाराज (वय ६४) हे दाेन्ही ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच किसन राठोड (वय ६०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना शेलुबाजार येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला (akola) येथे पाठविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT