mahableshwar, tapola, accident news saam tv
महाराष्ट्र

Mahableshwar Accident News : महाबळेश्वरहून फ्रिज, टीव्ही घेऊन निघालेला टेम्पो दाेनशे फूट दरीत काेसळला

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Mahableshwar Tapola Road Accident News : महाबळेश्वर तालुक्यातील अपघाताची मालिका काही संपेना. शनिवारी झालेल्या भीषण अपघातानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास पुऩ्हा एक अपघात (accident) झाला. या अपघातात एका वाहन सुमारे दाेनशे फुट खाेल दरीत काेसळले. या वाहनातील तिघे जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

महाबळेश्वर (mahableshwar) नजीकच्या चिखली शेड परिसरात रविवारी (ता. १५) रात्री दहा वाजता मेटगुताड येथून तापोळाच्या दिशेने निघालेले माल वाहतुक दोनशे फूट दरीत कोसळले. हा अपघात वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने घडला अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Breaking Marathi News)

या अपघातानंतर संबंधित वाहन झाडात अडकले. या वाहनात तिघे जण हाेते. ते तिघेही अपघातात जखमी झाले हाेते. अंधारातून एक जण दरीतून मुख्य रस्त्यावर आला. त्याने अपघाताची माहिती स्थानिकांना दिली.

चिखली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच सहयाद्री ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना दरीतून बाहेर काढले. या अपघातात श्रीकांत गणपत बावळेकर, विजय बजरंग मोरे आणि सुरज यशवंत घाडगे हे तीन युवक (youth) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT